Ad will apear here
Next
श्री क्षेत्र परशुराम : जयंतीनिमित्त आज ऑनलाइन दर्शन


आज (२५ एप्रिल २०२०) परशुराम जयंती आहे. दर वर्षी या दिवसापासून चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील श्री क्षेत्र परशुराम येथे तीन दिवसांचा उत्सव सुरू होतो. यंदा मात्र करोनाच्या संकटामुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे त्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने आजच्या दिवसासाठी ऑनलाइन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे.

भाविकांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून श्री परशुरामांचे ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. दर्शनासाठी येथे क्लिक करावे. 

श्री क्षेत्र परशुराम

श्री क्षेत्र परशुराम :
सात चिरंजीवांपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरान्त भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणहून मुंबईकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून उजवीकडे देवस्थानाला जाण्यासाठी रस्ता आहे. आदिलशाहीत जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आहे. खाली उतरतानाच्या जांभ्या दगडांच्या पायऱ्या (पाखाडी) जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये आदिलशाही वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचा घुमट या पद्धतीचा आहे. 

श्री परशुराम शयनकक्ष

उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या एका बेगमेने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते. ती अशी - एकदा या बेगमेच्या नौका समुद्रात बुडाल्या होत्या. या बेगमेला सागराचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला, की तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिच्या नौका खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागल्या. त्यानंतर परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. या मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. श्री परशुराम मंदिराच्या मागील बाजूस परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यंदा करोनामुळे त्यावर निर्बंध असल्याने देवस्थान ट्रस्टने ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे.





(रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील अन्य पर्यटनस्थळांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(फोटो सौजन्य : Ratnagiritourism)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOVCL
Similar Posts
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ! ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया... कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे
परशुराम जयंती हिंदू पंचागानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला परशुरामाची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांप्रमाणे याच दिवशी विष्णु देवाचे आवेशावतार परशुरामाचा जन्म झाला होता.
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language